Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विनापरवाना रास्ता रोको केल्याबद्दल शंकर माळवदेंसह 70 जणांवर गुन्हा
ऐक्य समूह
Friday, November 10, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: lo5
5सातारा, दि. 9 : सदरबझार येथे बुधवारी विनापरवाना रास्ता रोको केल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्यासह 60 ते 70 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे. माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, शरद प्रल्हाद गायकवाड, मेहबूब खान, बाळासाहेब गुळवे, वीरेंद्र चव्हाण, शैलेंद्र इलगे, मौलाआली डोंगरे, रसूल शेख, शब्बीर डोणगे यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सदरबझार येथील भीमाबाई आंबेडकर घरकुल योजनेतून वाटप करण्यात आलेल्या लाभधारकांना सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी सदरबझार येथील हिरवाई चौकात रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन करताना शंकर माळवदे यांच्यासह 60 ते 70 जणांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. 
विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनीच त्यांच्या विरोधात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: