Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोक्सो प्रकरणात कोणी, कितीही मोठा असला तरी त्याची गय करु नका
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:39 AM (IST)
Tags: lo1
ना. विजय शिवतारे यांच्या पोलीस अधीक्षकांना सूचना
5सातारा, दि. 10 : पोक्सो प्रकरणात आनंद पवार (रा. आरफळ, ता. सातारा) याच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी आणि विविध व्यक्तींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कोणीही कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना दिल्याची माहिती पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोक्सो प्रकरण गाजत आहे.आनंद पवार याने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्या प्रकरणीत्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 
या प्रकरणात त्याला महसूलमधील वरिष्ठ अधिकारी व बिल्डर यांनी सहकार्य केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे परंतु अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पोलिसांच्या कारवाईबाबत चर्चा सुरु असताना पालकमंत्री ना. शिवतारे यांना याबाबत विचारले असता त्यांनी हा गुन्हा गंभीर आहे. त्याची सर्व माहिती घेतली असून या प्रकरणी कोणीही कितीही मोठा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही. सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत असे ना. शिवतारे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: