Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पसरणी येथे विजेचा धक्का बसून शिकाऊ वायरमनचा मृत्यू
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:44 AM (IST)
Tags: re6
5वाई , दि. 10 : पसरणी, ता. वाई येथील वीज मंडळाच्या ठेकेदाराकडे कामास असलेला शिकाऊ वायरमन अक्षय रामदास कदम (वय 22 रा.ओझर्डे, ता.वाई) हा पसरणी भैरवनाथनगर येथील विजेची तक्रार दूर करण्यासाठी खांबावर काम करत असताना शॉक बसून त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 2.15 वाजता ही घटना घडली.
विजेची तक्रार दूर करण्यासाठी अक्षय खांबावर चढला होता. त्यावेळी त्याला विजेचा झटका बसला. त्याला तातडीने वाईच्या गितांजली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वी तो वीज मंडळाच्या ठेकेदाराकडे शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाला होता. तो आई-वडिलाना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची वाई पोलिसात नोंद झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: