Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण परिसरासह कोकण हादरले
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:44 AM (IST)
Tags: re4
5पाटण, दि. 10 : गुरुवारी पहाटे 5 वाजून 19 मिनिटांनी झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण परिसरासह कोकण हादरले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसून कोयना धरणही सुरक्षित असल्याचा निर्वाळा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला.
कोयना धरण परिसरासह सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्हा गुरुवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल एवढी होती. हा धक्का गुरुवारी पहाटे 5 वाजून 19 मिनिटांनी बसला. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल असल्याने नागरिक खडबडून जागे झाले. काहींनी घाबरून घराबाहेर पडणे पसंदकेले. भूकंपाच्या धक्क्याचा केंद्र बिंदूचेअंतर कोयना धरणापासून 21.6 कि.मी.वारणा खोर्‍यात जावळी गावच्या दक्षिणेस 1 किलोमीटर अंतरावर होता.या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 11 किलोमीटर इतकी नोंद झाली.कोयना धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलेअसून धरणात गुरुवारी 102.43टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र या धक्क्यामुळे कोयना धरण सुरक्षित असून पाटण तालुक्यात कोणत्याही ठिकाणी जीवितअथवा वित्तहानी झाली नसल्याचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपासून राज्यात रात्री थंडीचे प्रमाण वाढले आहे. दिवसा प्रचंड उष्मा होत आहे तर पहाटे परिसर धुक्क्यात हरवत आहे. असे विचित्र प्रकार वातावरणात घडत आहेत. याच विचित्र वातावरणात आज पहाटेचा भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का काही सेकंद झाल्याने साखरझोपेतील नागरिकांनी या भूकंपाच्या धक्क्याचा चांगलाच अनुभव आल्याने घाबरगुंडी झाली असल्याचे पहावयास मिळाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: