Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोटरसायकलवरून पडून युवकाचा जागीच मृत्यू
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:41 AM (IST)
Tags: re3
5मल्हार पेठ, दि. 10 : निसरे फाट्या जवळ मोटरसायकलवरून पडून डावरी गावातील युवकाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, पाटण-उंब्रज मार्गावर शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास उरुल घाटातील तीव्र उतारावर वेगातील मोटरसायकल (क्र. एम. एच. 50 एच 7596) निसरे फाटा नजीकच्या खड्ड्यात जोरात आदळून त्यावरील संदेश बापू कांबळे (वय 22, रा. डावरी) हा युवक रस्त्यावर पडल्यामुळे त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळाचा पंचनामा करूनपोलिसांनी मृतदेह शवविच्छेदना-साठी पाठवून दिला आहे. अपघाताची नोंद मल्हार पेठ पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: