Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

स्वभाषाभिमान
ऐक्य समूह
Saturday, November 11, 2017 AT 11:50 AM (IST)
Tags: vc1
महात्मा गांधीजी आफ्रिकेतलं काम संपवून ज्या दिवशी मुंबईस परत आले त्या दिवशीची ही गोष्ट. मुंबईच्या वृत्तपत्रांचा एक बातमीदार थेट मुंबई बंदरावरच गांधीजींना भेटला. गांधीजी बोटीतून उतरून धक्क्यावर येताच, तो पुढे जाऊन गांधीजींना म्हणाला, ‘गुड मॉर्निंग, मिस्टर गांधी !’ तो इंगˆजीत बोलू लागताच त्याला गांधीजींनी हटकलं. ते त्याला म्हणाले, ‘अरे भाई, तुम्ही हिंदी आहात नि मीही हिंदीच आहे. तसंच तुमची नि माझीही मातृभाषा गुजरातीच आहे. मग का उगीच इंगˆजीत बोलता? का तुम्हाला असं वाटलं की एकवीस वर्षे आफ्रिकेत राहिल्यामुळे आपली मातृभाषासुद्धा मी आता विसरलो असेन म्हणून? का बॅरिस्टरशी बोलताना इंगˆजीतच बोलण्यात तुम्हाला मोठेपणा वाटतो?’ गांधीजींच्या या अनपेक्षित प्रश्‍नांनी तो बिचारा बातमीदार तर चक्क गारठलाच अन् तो चकितही झाला. दुसर्‍या दिवशी आपल्या वृत्तपत्रात छापलेल्या गांधीजींच्या त्यांच्या मुलाखतीत या त्यांच्या प्रश्‍नापासूनच त्यानं सुरवात केली होती.
कथा उपदेश : एकमेकाशी बोलताना आपण आपल्या मातृभाषेत बोलायचं. ते जर शक्य नसेल तर राष्ट्रभाषेत बोलायचं अन् तीही येत नसली तरच निरुपाय म्हणून इंगˆजीत बोलावे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: