Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

वनौषधी
ऐक्य समूह
Wednesday, November 15, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: vc1
तरुण पती तीर्थयात्रेस निघाला. पत्नी विरहाच्या आशंकेने व्याकुळली. तिचे मन वळवण्याची बरीच खटपट केली. पण नवरोजी बधले नाहीत. अखेर तिने तब्बेतीची काळजी घ्या, असे काकुळतीने विनविले. आईने घरगुती वनस्पतींचे बाळकडू पाजलेले. त्यामुळे एक तोडगा तिला आठवला. जाण्याच्या वाटेवर नेहमी चिंचेच्या झाडाखाली झोपत जा नि परतीच्या वाटेवर आठवणीने निंबाखाली’. तसे तिने पतीकडून वचन घेतले. दोन महिने तरी पतिराज दूर राहणार होते. पण आता निश्‍चित होती. तिच्या मनासारखे झाले. नवरा पंधरा दिवसांनीच परतला. इंगित असे की, चिंचेच्या छायेत झोपल्यास सर्दी-पडशाला, हिवतापाला आवतण दिल्यासारखे होते. जाताना तसे केले नि आजारी पडून त्याने परत फिरायचे ठरवले. मजल दरमजल करत परत फिरताना त्याने वचन दिल्याप्रमाणे कडुनिंबाचा आसरा घेतला नि त्याची बिघडलेली तब्येत सुधारली. पत्नीचा हेतू साध्य झाला. याचा अर्थ असा
नव्हे की, निंबाची झाडे लावली तर गावात दवाखान्याची गरज सरली !
कथा उपदेश : वनस्पतींचे गुणधर्म उमजून त्या आपण अधिक वापरायला शिकावे, इतकेच.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: