Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

वेड्यांचा बाजार
ऐक्य समूह
Saturday, November 18, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: vc1
एका शहरात एक वेड्यांचे इस्पितळ होते. तेथील वेडे पहावे म्हणून एक माणूस इस्पितळात गेला. त्याने अनेक वेडे पाहिले. त्यांच्यापैकी त्याने एक तरुण व सुरेख वेडा पाहिला. त्याच्या शेजारी बसून त्याने त्याला विचारले की, ‘अरे, तू येथे कसा आलास?’ तो तरुण म्हणाला, ‘तुमचा हा प्रश्‍न बरोबर नाही पण त्याचे उत्तर मी देतो. त्याचे असे झाले, मी लहानपणापासून बुद्धिमान होतो त्यामुळे माझ्या वडिलांना वाटे मी मोठा विद्वान व्हावा. माझ्या आईला वाटे मी मोठा श्रीमंत व्हावा. माझ्या शिक्षकांना वाटे मी मोठा पुढारी व्हावा. माझ्या गायनशिक्षकाला वाटे मी मोठा गवई व्हावा. या सार्‍या गोंधळामध्ये माझा मी हरवून बसलो. माझे मन कशातच लागेना म्हणून एका डॉक्टरच्या सल्ल्याने मला येथे आणून सोडले. येथे मला बरे वाटते. कारण माझा मी माझ्यापाशी असतो. माझ्याबद्दल मी विचार करू शकतो.’ हे सांगून तो मानलेला वेडा क्षणभर थांबला आणि त्याने त्या माणसाला विचारले की, ‘शिक्षण, स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा यांच्यापायी वेड लागून तुम्ही येथे आलात काय?’ तो म्हणाला, ‘नाही, तसे नाही. मला माझे वेड लागले आहे. त्या मीचे निरोगी स्वरुप दाखवणारा कोणी आहे काय ते पाहण्यास मी येथे आलो.’ तेव्हा तो तरुण म्हणाला, ‘म्हणजे वेड्यांच्या बाजारातून तुम्ही इकडे आलात.’  कथा उपदेश : प्रत्येक माणूस वेडाच आहे. दृश्याचे वेड सोडून अदृश्याचे वेड लागलेली माणसेच जीवनात स्वस्थ होतात.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: