Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

युक्ती
ऐक्य समूह
Monday, November 20, 2017 AT 11:40 AM (IST)
Tags: vc1
एकदा एका सिंहाने आणि गाढवाने भागीदारीत शिकार करण्याचे ठरवले. हिंडता हिंडता ते रानटी मेंढराच्या एका गुहेपाशी आले. सिंह गाढवाला म्हणाला, ‘आपण असे करूया, मी गुहेच्या बाहेर उभा राहतो. तू आत जाऊन जोरजोरात ओरडायला सुरुवात कर. सगळ्या रानटी मेंढ्या घाबरून बाहेर येतील आणि मग मी त्यांचा फडशा पाडतो’, असे म्हणून सिंह बाहेर गुहेच्या दारापाशी पाळतीवर राहिला. गाढवालाही सिंहाची युक्ती पटली आणि त्याने आत घुसून मोठ्याने खिंकाळण्यास सुरुवात केली. रानटी मेंढ्या गाफील होत्या, त्यांना असा हल्ला अपेक्षितच नव्हता. नंतर त्याने आत जोरदार गोंधळ माजविला की, त्यामुळे सर्व मेंढेरे बाहेर पडली आणि आयतीच सिंहाच्या तावडीत सापडली. सिंहाने बहुतेक सर्वांना पकडून मारले.
शेवटी गाढव बाहेर आले आणि दमून धापा टाकत सिंहाला म्हणाले, काढलं की नाही सगळ्यांना बाहेर? कसं काय वठलं नाटक?’ ‘अरे, विचारतोस काय?’ सिंह खो खो हसत म्हणाला, ‘खरं सांगायचं म्हणजे तू गाढव आहेस, हे मला माहीत नसते तर स्वत: मीसुद्धा तुला घाबरलो असतो पण यातील मांसाचा एकही तुकडा तुला मिळणार नाही आणि जास्त बोलशील तर तुलाही खाऊन टाकेन. जा इथून.’ गाढवाला कळून चुकले, की पोकळ बढाया कुठेही चालत नाहीत. त्यामुळे नुसती दामछाक होते.
कथा उपदेश : खोट्या बढायांनी काही साध्य होत नाही, तर फजितीच होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: