Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

लगाम हाती हवा
ऐक्य समूह
Friday, November 24, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: vc1
इराणचा क्रूरकर्मा बादशहा नादिरशहाने ‘बुद्धीचे बळ नि मनगटाची मस्ती’ यांच्या जोरावर दिल्लीपर्यंत धडक मारून सामˆाज्य विस्तार केला. त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर मोहम्मदशाहा रंगीले हे होते. या दिल्लीपतीने विजयी नादिरशहाला हत्तीच्या अंबारीत बसवून शहराची सैर घडवण्याचा हुकूम दिला. शाही पीलखान्यातील ऐरावतासारखा उमदा हत्ती हजर झाला. सोन्याची अंबारी, भरजरी झूल, त्याला रुप्याच्या झालरी नि झिरमिल्या, मोत्यांच्या माळा, इराणच्या शहाला हत्ती हे वाहन अपरिचित होते. अंबारीत स्थानापन्न होतो तो त्याला अंबारीपुढे एक शाही हुजर्‍यासारखा दिसणारा इसम बसलेला दिसला. तो बिचारा माहूत होता. ‘कोण रे बाबा तू? तुझं काय काम? लगाम माझ्या हाती सोपव नि आपला रस्ता सुधार.’ नादिरशहानं फर्माविले. माहूत चमकला. थोडा वेळ थांबला. अखेर धैर्य एकवटून त्याने म्हटले, ‘खाविंद, कसूर माफ असावी. हत्तीला लगाम नसतो. माहूतच हातच्या अंकुशानं जनावरावर नियंत्रण ठेवतो.’ नादिरला नवल वाटलं. ‘आश्‍चर्य आहे. या अजस्त्र प्राण्याला लगाम नसतो? तर मग मी उतरतो. ज्या वाहनाचा लगाम माझ्या हाती नाही त्यावर मी बसणार नाही. स्वत:ची बहुमोल जिवन दुसर्‍याच्या हाती सोपवणारा हा नादिरशहा नव्हे.’ माहुताने इशारत करताच हत्ती झुकला. पुढचे गुडघे टेकले. शाही स्वारी पायउतार झाली.
कथा उपदेश : जीवनाची वेसणदोरी त्याने सदोदित स्वत:च्या हाती ठेवली यातच कदाचित त्याच्या यशाची गुरूकिल्ली असेल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: