Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

रुग्णसेवा
ऐक्य समूह
Saturday, November 25, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: vc1
स्वामी विवेकानंद पाश्‍चात्य देशांचा प्रवास करून परत आले आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खूपच खालावली. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला म्हणून ते दार्जिलिंगला गेले. तेथे असतानाच त्यांना बातमी समजली की, कलकत्त्यात प्लेगने हाहाकार माजवला आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. आपण अशावेळी विश्रांती घेत बसणे पूर्णपणे चूक आहे असे स्वामीजींना वाटले. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना प्राण गेला तरी चालेल पण आपण ही रुग्णसेवा केलीच पाहिजे, असे ठरवून ते कलकत्त्यास परत आले. तेथे आल्यावर त्यांनी एक पत्रक काढून सर्वत्र वाटले. त्यात म्हटले होते की, ज्यांना कोणाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल, त्यांना ती रामकृष्ण संघाकडून मिळेल. त्यांनी सेवापथके स्थापन केली आणि रुग्णांची शुश्रूषा करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले.
कथा उपदेश : जो आपले स्वत:चे दु:ख विसरून दुसर्‍याच्या मदतीसाठी धावतो तो खरा समाजसेवक होय.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: