Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

बलाढ्याशी लढा
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: vc1
एकदा एका उन्मत्त हत्तीनं वृक्षाला धडक दिली. चिमणा-चिमणीचं घरटं उद्ध्वस्त होऊन खाली पडलं. त्यातली अंडी फुटून गेली. ती दोघं दु:खी झाली. हत्तीला धडा शिकवायचा होता त्यांना पण कसा, हा प्रश्‍न होता. त्याचं सांत्वन करायला आलेल्या माशी, बेडूक व सुतार पक्ष्यानं मिळून एक युक्ती केली. चिमणा-चिमणीला धीर दिला. आपण दुर्बल असलो तरी काय झालं? बलाढ्याशी लढा देऊ. मग ठरल्याप्रमाणे हत्तीच्या कानापाशी माशी गुणगुणली. खड्ड्याच्या टोकापाशी बेडकानं आवाज काढला. तिथे पाणी असावं म्हणून हत्तीनं तिथे पाऊल ठेवलं आणि तो खड्ड्यात पडला. सुतार पक्ष्यानं या गडबडीत त्याचा डोळा फोडला. अशारीतीने तिघांना एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने त्या बलाढ्य हत्तीला धडा शिकविला.

कथा उपदेश : थोडी युक्ती, साहस आणि एकी असेल तरी बलाढ्याशीही लढा देता येईल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: