Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खाजगी सावकारी करणार्‍या महिलेला पोलिसांनी पकडले
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:44 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 4 : खाजगी सावकारीचा गुन्ह्यात अंजूम शेख या महिलेला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अनिल जयसिंगराव जाधव (रा. करंडी, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंजूम शेखवर खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी जाधव यांनी व्यवसायासाठी अंजूम शेखकडून तीन लाख रुपये घेतले होते. ही रक्कम त्यांनी दहा टक्के व्याजदराने घेतली होती. अनिल जाधव यांनी तिला पैसे परत दिले होते. मात्र तरीही ती आणखी दोन लाख रुपये बाकी असल्याचे सांगून त्यांना धमकी देत होती. एक महिन्यापूर्वी अंजूम शेख आणि चार जण जाधव यांच्या घरी गेले.
त्यांनी जाधव यांना आणि त्यांच्याघरातील महिलांना शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक सी. एम. मछले तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: