Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वेळे येथील अपघातात एक जण ठार, एक जखमी
ऐक्य समूह
Tuesday, December 05, 2017 AT 11:41 AM (IST)
Tags: re1
5भुईंज, दि. 4 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत मोटरसायकलला कारने पाठीमागून धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा बाजूकडे जाणार्‍या हिरो होंडा (एमएच-11-बीई-9139) मोटरसायकलला पाठीमागून येणार्‍या कारने (एमएच-12-एमबी-0276) धडक दिल्याने मोटरसायकलस्वार दत्तात्रय छबन शिंदे (वय 28) व मागे बसलेले गणेश गोकुळ कानडे (दोघे रा. बोपेगाव, ता. वाई) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
तेथे उपचार सुरू असताना दत्तात्रय छबन शिंदे यांचा मृत्यू झाला. गणेश कानडे यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठविण्यात आले आहे. उत्तरीय तपासणी केल्यानंतर दत्तात्रय शिंदे यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर बोपेगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीसठाण्यात झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: