Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाईकबोमवाडी येथील खुनाचा छडा लावण्यात यश
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: re3
5फलटण, दि. 5 : नाईकबोमवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत नाईकबोमवाडी-तातमगिरी या रस्त्याच्या बाजूला खून करुन खड्ड्यात टाकून दिलेल्या अज्ञात युवकाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या प्रकरणी पुणे येथील 6 संशयितांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या बाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवार, दि. 3 डिंसेबर रोजी सकाळी 7 पूर्वी फलटण- शिंगणापूर रस्त्यावर नाईकबोमवाडी गावच्या हद्दीत युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्यांचे नाव सचिन विश्‍वनाथ ठाकूर (वय 19 रा. काळेवाडी, पुणे. मूळ गाव बिदर कर्नाटक) असे असून जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांचा खून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे. लग्न समारंभास जाण्याच्या बहाण्याने त्याला गाडीत घेऊन चौघे त्याच्यासोबत शिंगणापूर रस्त्याने घटनास्थळी आले. तेथे चार जणांनी सचिनच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याचे व त्यानंतर चारहीजण फरार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. सचिनची हत्या का झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संशयितांचा शोध सातारा व फलटणचे पोलीस करीत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: