Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोक्सो प्रकरणातील संशयित जामिनासाठी उच्च न्यायालयात
ऐक्य समूह
Wednesday, December 06, 2017 AT 10:53 AM (IST)
Tags: lo1
अजित पवारला अद्याप अटक नाही
5सातारा, दि. 5 : पोक्सो प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर  संशयित आनंद पवार यानेे मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आनंद पवारला अटक करण्याच्या पलीकडे पोलिसांची कार्यवाही गेलेली नाही. पोलिसांना या प्रकरणातील मोठा संशयित पुणे येथील उपायुक्त अजित पवार हा अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे एकूणच पोलिसांच्या तपासावरच प्रश्‍न उपस्थित होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आनंद पवार (रा. आरफळ, ता. सातारा) याच्याविरुध्द ऑगस्ट महिन्यात पोक्सो कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी पोलीस ठाण्यात हजर झाली व तिने घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस संशयित आनंद पवार याचा शोध घेत होते.  
अखेर आनंद पवार हा 11 ऑक्टोबर रोजी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तपासामध्ये अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. मात्र पोलीस कायद्यानुसार अपेक्षित तपास करताना दिसत नाहीत.    
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: