Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कालवडे येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि.6 : कालवडे, ता. कराड येथे विहिरीत पडून 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंजुळाबाई जगन्नाथ मोटे असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहितीअशी, की मंजुळाबाई मोटे यांच्यावर दोन वर्षांपासून वैद्यकीय उपचार सुरू होते. दि. 5 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता त्या जेवण करून घरासमोर उभ्या राहिल्या होत्या. दुसर्‍या दिवशी मंजुळाबाई मोटे या घरात दिसल्या नाहीत. कुटुंबियांनी शोध घेतल्यावर त्या रात्रभर घरी नसल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी त्यांचा शोधसुरू केल्यावर साक्षी सुनील मोटे हिला मंजुळाबाई मोटे यांचा मृतदेह बालिश भिकोबा थोरात यांच्या मालकीच्या विहिरीत तरंगत असल्याचे समजले. तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनी जाऊन खात्री केली असता तो मंजुळाबाई मोटे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. मंजुळाबाई मोटे या मनारुग्ण होत्या. त्यांच्यावर दोन वर्षांपासून उपचार सुरू होते. यातूनच हा प्रकार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: