Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पोक्सोच्या गुन्ह्यात मुख्य संशयिताला उच्च न्यायालयात जामीन मंजूर
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 :  पोक्सो प्रकरणात अटकेत असलेला संशयित आनंद पवार याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान,  पोक्सो प्रकरणातील क्रमांक 2 चा संशयित आणि रोजगार हमी योजनेचा उपायुक्त अजित पवार याला अद्यापही पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. अजित पवारला अटक न करताही मुख्य संशयिताला जामीन मंजूर झाला असून हा जामीन पोलिसांनी सक्षमपणे बाजू न मांडल्यानेच झाला असण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात आनंद पवार (रा. आरफळ, ता. सातारा) याच्याविरुद्ध ऑगस्ट महिन्यात पोक्सो कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी पोलीस ठाण्यात हजर झाली व तिने घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस संशयित आनंद पवार याचा शोध घेत होते. 
अखेर आनंद पवार हा 11 ऑक्टोबर रोजी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तपासामध्ये अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. मात्र पोलीस कायद्यानुसार अपेक्षित तपास करताना दिसत नाहीत.  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: