Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मलकापूर येथे दोन गटात हाणामारी
ऐक्य समूह
Thursday, December 07, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 6 : मलकापूर येथील शिवछावा चौकात युवकांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. भर रस्त्यातच तुंबळ हाणामारीने परिसरात तणावाचे वातावरण होते.
मलकापूर येथे शहरात अनेक व्यवसाय व नोकरीनिमित्त मोठी वर्दळ असते. त्यातच अलीकडे परगावातील भांडणांचे परिणाम या शहरात विविध गट येवून भांडणे होण्याचे प्रकार अधिक वाढत आहेत.
मंगळवारी रात्री शिवछावा चौकात घडलेला प्रकारही असाच एक होता. युवकांच्या गटाने रस्त्यावरच गोंधळ घातल्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी झाली होती. या दोन गटातील हाणामारीमुळे शहरात उलट सुलट चर्चा होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: