Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कालगाव येथे दोन ट्रॅक्टर, तीन यार्‍या जप्त
ऐक्य समूह
Tuesday, January 09, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: re2
अवैध वाळू उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश
5कराड, दि. 8 : कालगाव, ता. कराड येथे अनेक दिवसांपासून रात्री होणार्‍या वाळू चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर कराड तहसील कार्यालयाच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकून दोन ट्रॅक्टर व तीन यार्‍या जप्त केल्या. वाळू चोरी करणारे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. दरम्यान, अवैध वाळू उत्खनन व चोरी प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदवण्याचे आदेश तहसीलदारांनी मंडलाधिकारी व तलाठ्यांना दिले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओ कार्यालयास दिला आहे.
याबाबत माहिती अशी, कालगाव येथे अनेक दिवसांपासून अनधिकृत वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र शेळके यांना मिळाली.त्यांनी मंडलाधिकारी चक्के व तलाठी शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार अजित कुर्‍हाडे, मंडलाधिकारी व तलाठ्यांनी रविवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कालगाव येथे वाळू उत्खननाच्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत तीन यार्‍या व दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. वाळू चोरी करणारे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलमे व प्रचलित परिपत्रकानुसार पाचपट दंडाची कारवाई करून फौजदारी गुन्हे नोंदवण्यात येणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: