Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खिंडवाडी येथे मारहाण करून प्रवाशाचे 50 हजार लुटले
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी, ता.सातारा येथे प्रवाशाची लूटमार करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडील रोख 50 हजार रुपये व मोबाईल  जबरदस्तीने काढून घेवून व्हॅनमधून आलेल्या अनोळखी चौघांनी पलायन केले. या घटनेत प्रवाशाला मारहाण केल्यानंतर बांधून नाल्यात फेकल्याचीही घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, घटनेतील प्रवासी जखमीचे शंकर बाळू जाधव (वय 65, रा. भाटमरळी, ता. सातारा) असे नाव आहे. शंकर जाधव यांचा बैल व भाजी व्रिकीचा व्यवसाय आहे. मंगळवारी ते व्यवसायाच्या निमित्ताने आरफळ, ता.सातारा येथे आले होते. काम न झाल्याने ते  पुन्हा जाण्यासाठी निघाले. बाँबे रेस्टॉरंट येथे आल्यानंतर त्यांना पांढर्‍या रंगाच्या व्हॅनने लिफ्ट दिली. रात्री 9.30 च्या सुमारास व्हॅनमध्ये चौघे व तक्रारदार शंकर जाधव असे पाचजण होते. व्हॅन खिंडवाडीच्या अलीकडे आल्यानंतर खाणीलगत नेण्यात आली.  
यावेळी संशयितांनी जाधव यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांच्याकडील रोख 50 हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर संशयितांनी जाधव यांना बांधले व जाताना नाल्यामध्ये फेकून देवून व्हॅनसह पोबारा केला.या प्रकरणानंतर जाधव यांनी पायी  शेंद्रे गाठले. तेथून मुलाला फोन लावून बोलावून घेतले. जखमी अवस्थेत जाधव यांना त्यांच्या मुलाने  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: