Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यादोगोपाळ पेठेतील दोन दुकानांवर दगडफेकीने खळबळ
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 12 : यादोगोपाळ पेठेतील दोन दुकानांवर अज्ञात माथेफिरुंनी शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास दगडफेक केल्यानेखळबळ उडाली.
यादोगोपाळ पेठेतीलगोल मारुती मंदिराच्या चौकातील एका मिठाईच्या दुकानावर पहिल्यांदा दगडफेक झाली. त्यानंतर दुकानातील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर शेजारच्या इस्त्रीच्या दुकानातही एक दगड पडला. या घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तीन जणांना एका दुचाकीवरुन पळून जाताना पाहिले.
या घटनेमध्ये संबंधित युवकांनी मिठाईच्या दुकानातील मालकाला दोन हजार रुपये मागितल्याची माहिती पुढे येत आहे.  
पैसे न दिल्याने दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. चौकशी सुरु असून तक्रार दाखल झाल्यानंतर नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: