Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

पाचगणीत मुलींसाठी कराटे प्रशिक्षण वर्ग सुरू
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: sp2
5पाचगणी, दि. 6 : जगात आज मुली आणि महिला असुरक्षित आहेत. त्यांनी स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. मुलींनी न घाबरता परिस्थितीशी दोन हात केले पाहिजेत. त्यासाठी कराटे प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारठे यांनी केले.
जिल्हा परिषदेचा बालकल्याण विभाग, ओकिनोव्हा सेल्फ डिफेन्स अ‍ॅकॅडमी व महाबळेश्‍वर येथील सह्याद्री ट्रेकर्स यांच्यावतीने हिलरेंज माध्यमिक विद्यालयात मुलींसाठी आयोजित केलेल्या कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हिलरेंज विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, हायस्कूलचे प्राचार्य जतीन भिलारे, तेजस्विनी भिलारे, नंदकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजकंटकांमुळे मुलींच्या रक्षणाची काळजी पालकांना भेडसावत आहे. मुलींनी स्वरक्षणासाठी कराटेसारखे प्रशिक्षण घेणे, ही काळाची गरज आहे. जास्तीत जास्त मुलींनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन तेजस्विनी भिलारे यांनी केले. हे प्रशिक्षण दोन महिने चालणार असून कराटेबरोबर योग, काठी चालविणे, आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रकाश बेलोशे यांनी प्रास्ताविक केले. सुनील गुरव यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: