Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सेन्सेक्सची पुन्हा घसरगुंडी
ऐक्य समूह
Saturday, February 10, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : व्याजदर वाढीची शक्यता आणि जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमधील घसरण याचा फटका शुक्रवारी शेअर बाजाराला बसला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 407 अंशांनी कोसळून 34 हजार 5 अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची 4 जानेवारीनंतरची नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही 121 अंशांची घसरण होऊन 10 हजार 454 अंशांवर बंद झाला. या आठवड्यात  सेन्सेक्समध्ये 1 हजार 60 अंश आणि निफ्टीमध्ये 305 अंशांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टनंतर आठवडाभरात दोन्ही निर्देशांकात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: