Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; लीलावती रुग्णालयात दाखल
ऐक्य समूह
Saturday, February 10, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटासंबंधी दुखण्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते. मात्र, अद्याप त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि बच्चन कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अमिताभ बच्चन यांना 2012 मध्ये  देखील शस्त्रक्रियेकरता 12 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बच्चन यांना यकृतासंबंधीचा त्रास आहे. त्याचबरोबर 2005 मध्ये देखील त्यांच्यावर पोटात प्रचंड दुखत असल्याने आतड्यांसंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या समस्येवर योग्यवेळी उपचार घेण्यात आले नाहीत तर ते घातक ठरू शकते, असे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले होते. या आजारामध्ये छोटे आणि मोठे आतडे कमजोर होत जातात. त्यामुळे आतड्यांवर सूज येते. त्यामुळे बच्चन यांना यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यावेळी त्यांना दोन महिने रुग्णालयात रहावे लागले
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: