Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मॉस्कोत विमान कोसळले;
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: mn3
71 प्रवासी ठार?
5मॉस्को, दि. 11 (वृत्तसंस्था) : रशियाची राजधानी मॉस्को शहराच्या बाहेर विमानाला अपघात झाला असून यात 71 प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सारातोव एअरलाइन्सचे ङ्गअँतोनोव एन-148फ हे विमान दोमोदेदोवो विमानतळावरून ओर्स्कला जात होते. मॉस्को शहराच्या बाहेर हे विमान कोसळले, असे सांगण्यात येत आहे. या विमानात 65 प्रवासी होते तसेच पायलटसह अन्य 6 सदस्य होतेे. दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अवशेष सापडले आहेत. त्या ठिकाणी आपत्कालीन मंत्रालयाने एक पथक पाठवले असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.
अरुगुनोवा गावाजवळ आकाशातून जळालेले विमान पडताना पाहिल्याचा दावा काही गावकर्‍यांनी केला. दरम्यान, विमानाला अपघात कशामुळे झाला याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. खराब हवामान किंवा पायलटची चूक हे दोन कारण अपघाताचे होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करून तपास सुरू करण्यात आल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: