Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेअर बाजारात तेजी
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या सत्राची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्स 200 अंकांनी वधारून 34,203 अंकांवर खुला झाला तर निफ्टीनेही 63 अंकांची वाढ नोंदवून 10, 516 अंकांवर व्यवहार करत होता.
सुरुवातीच्या सत्रात जवळपास सर्वच क्षेत्रातील समभागांमध्ये तेजी दिसून आली. बीएसईचा निर्देशांक 200 अंकांनी वाढला. सुरुवातीला अपोलो टायर्स, फर्स्टसोर्स, सीजी पॉवर्स, अमर राजा बॅटरी, सीएट, बँक ऑफ बडोदा, ओएनजीसी, सन टीव्ही, मॅरिको, बिर्ला कॉर्प, ब्रिटानिया, एमएमटीसी, इंडियन बँक, एल अँड टी व्हीव्हीमेड, कडिला हेल्थ, इंटरग्लोबल एव्हिशन, रिलायन्स इन्फ्रा आदी समभागांमध्ये तेजी दिसली तर एसबीआय, बीपीसीएल, सुजलॉन एनर्जी, त्रिवेणी टर्बाइन, सीएसके कन्झ्युमर आदी समभागांची विक्री जोरात झाली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: