Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शोपियन प्रकरण : मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस स्थगिती
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : शोपियनमध्ये झालेली दगडफेक रोखण्यासाठी लष्कराने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी मेजर आदित्य कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे यापुढे कुमार यांना चौकशीसाठी बोलवता येणार नाही.
मेजर कुमार यांचे वडील लेफ्टनंट कर्नल करमवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. करमवीर सिंह यांनी याबाबत दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. काही दिवसांपूर्वी शोपियनच्या गानोव्हपोरा गावात दगडफेकीची घटना घडली होती. या गावात दगडफेक करणार्‍या हिंसक जमावावर लष्कराला गोळीबार करावा  लागला होता. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता.
कमरवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मेजर कुमार यांच्यावरील कारवाईस स्थगिती दिली आहे. त्यामुळे यापुढे कुमार यांना चौकशीसाठी बोलवता येणार नाही आणि त्यांना अटकही करता येणार नाही. तसेच याबाबत जम्मू-काश्मीर सरकारला दोन आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: