Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आरएसएस मोदी सरकार चालवत आहे : राहुल गांधी
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: na5
5बंगळुरू, दि. 13 (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि आरएसएसवर आपला निशाणा साधला. केंद्रातील मोदी सरकार आरएसएस चालवत आहे. प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसचे लोक असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मंगळवारी केला.  
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे. काँग्रेस आपली सत्ता राखण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. भाजप कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असेल. चार दिवसांपासून राहुल गांधी कर्नाटकच्या दौर्‍यावर आहेत. कर्नाटक येथील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी आज बिजनेस लीडर्स आणि प्रोफेशनल्ससोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संघ आणि भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सध्या मोदी सरकार संघ चालवत आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागात त्यांचे लोक आहेत. सचिव पदाची नियुक्तीही आरएसएसच करत आहे.
ते पुढे म्हणाले, निती आयोगामध्येही आरएसएसचे लोक आहेत. भाजपचा भारतातील प्रत्येक इन्स्टिट्यूशन
कॅप्चर करण्याचा प्रयत्न आहे. भारताची विदेश नीतीही त्यामुळेच खराब होत आहे. चीन आपल्या शेजारील सर्व देशांवर आपला धाक जमवून बसला आहे आणि भारत एकटाच पडला आहे. राहुल गांधी यांनी यावेळी व्यापार्‍यांना जीएसटी कमी करू, असे आश्‍वासन दिले. ते म्हणाले, 2019 मध्ये जर आम्ही सत्तेत आलो तर या किचकट आणि कठीण जीएसटीमधून सर्वांची मुक्तता करू तसेच टॅक्स स्लॅब आणखी कमी करू. नोटाबंदी ही आरबीआयची नसून
आरएसएसची आहे.
भाजपकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच
भाजप हा खोटे बोलणार्‍या मंडळींचा पक्ष आहे. त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही. तरुणांना रोजगार, शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये अशी सारीच भाजप व नरेंद्र मोदी यांची आश्‍वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी तिथे काँग्रेस व भाजप दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकासकामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपने दिलेली आश्‍वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: