Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अ‍ॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: na2
तिन्ही सैन्यदलांसाठी शस्त्र खरेदी
5नवी दिल्ली, दि.13 (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयाने अ‍ॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. लष्कर, नौदल आणि वायुसेना यातील सैनिकांसाठी या रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या संदर्भातल्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या रायफल्सची किंमत 12,280 कोटी इतकी असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
संरक्षण विभागाची एक बैठक संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्याच बैठकीत हा निर्णय  घेण्यात आला. 1,819 कोटींच्या लाईट मशीन गन्सही विकत घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत स्नाईपर रायफल्सबाबतही चर्चा झाली. 5719 स्नाईपर रायफल्सच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या स्नाईपर रायफल्सची किंमत 982 कोटी रुपये असल्याचीही माहिती समोर आली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: