Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
31 तासांच्या चकमकीनंतर सीआरपीएफच्या तळावर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: na2
5श्रीनगर, दि. 13 (वृत्तसंस्था) : श्रीनगरच्या करणनगरमध्ये सीआरपीएफच्या तळाजवळील इमारतीत लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोघांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. तब्बल 31 तासांहून अधिक काळ सुरू असलेली ही चकमक अजून सुरूच आहे. मात्र काही लोकांनी जवानांवर दगडफेक सुरू केल्याने लष्करी कारवाईत अडथळा निर्माण होत आहे.
सुंजवा येथे लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर अतिरेक्यांनी सोमवारी श्रीनगरातील करणनगर येथील सीआरपीएफच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अतिरेक्यांच्या या हल्ल्यात एक जवान शहीदही झाला होता. या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण ते मुख्यालयात घुसण्यात अयशस्वी ठरले. 
मात्र जवळच्याच एका इमारतीत घुसून त्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. तब्बल 30 तासांहून अधिक काळ ही चकमक सुरू होती. आज दुपारी जवानांनी या इमारतीभोवती वेढा देऊन दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, ही चकमक सुरू असतानाच जवानांनी या इमारतीतील पाच कुटुंबांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: