Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना मिळणार 54 लाखांचा मोबदला
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : मंत्रालयात विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना 54 लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे.
पाटील यांच्या पाच एकर जमिनीसाठी 54 लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.  
यापूर्वीचा पंचनामा रद्द करून रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे. मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे धर्मा पाटील यांच्या नावे 28 लाख 5 हजार 984 रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना 26 लाख 42 हजार 148 रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: