Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पतीने केलेल्या अनैसर्गिक शरीरसंबंधांमुळे विवाहिता रुग्णालयात दाखल
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 13 : पतीने वारंवार अनैसर्गिक शरीरसंबंध केल्यामुळे शारीरिक त्रास झालेली एक विवाहिता उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पत्नी इस्टेट एजंट असलेल्या पतीविरुध्द पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवणार असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
याबाबत माहिती अशी, संबंधित महिला 38 वर्षांची आहे. तिचा पती बांधकाम व जागा विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने पहिल्या पत्नीपासून काडीमोड घेऊन पीडित महिलेसोबत दुसरा विवाह केला आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. पीडित महिला गुजराथी असून तिनेही पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. 
तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. पीडितेची पहिल्या पतीपासून फारकत झाल्यानंतर तिची इस्टेट एजंटाशी ओळख वाढली. त्यानंतर दोघांनी 2009 साली प्रेमविवाह केला असून हे दाम्पत्य दोन मुलांसह सातार्‍यात राहते. गेल्या काही महिन्यांपासून पती अनैसर्गिक शरीरसंबंध करत असल्याने पीडित महिला मानसिक दडपणाखाली आहे. पतीला तसे कृत्य न करण्यास सांगूनही पतीने जबरदस्ती केल्याने पीडितेला शारीरिक त्रास होऊ लागला. त्यामुळे अखेर ही पीडिता उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू असून पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवणार असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, पीडितेचा पती आता तिसर्‍यांदा बोहल्यावर चढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आपल्यापासून सुटका करुन घेण्यासाठीच तो अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: