Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान करणार तज्ज्ञांशी चर्चा
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. येत्या 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्ली येथे  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील 250 तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत.
शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करून मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेकदा या घोषणेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळेच आता रिझल्ट दाखवण्याच्या उद्देशाने उशिरा का होईना पण सरकारकडून पावले टाकण्यास सुरुवात झाल्याचे दिसते आहे.
त्यासाठी येत्या 19 व 20 फेब्रुवारीला दिल्ली येथे या विषयावर देशभरातल्या 250 तज्ज्ञांसोबत पंतप्रधान महामंथन करणार आहेत. दिल्ली येथील पुसा इन्स्टिट्यूटमध्ये यावर शेतीशी संबंधित तज्ज्ञांची मते ऐकून घेणार आहेत, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. या कार्यक्रमासाठी एकूण सात टीमची  रचना करण्यात आली आहे. यात शेतीच्या उत्पादन ते विक्री या साखळीतल्या विविध विषयांवर फोकस ठेवून या टीम बनवल्या गेल्या आहेत. त्यातल्या एका टीमचे नेतृत्व पाशा पटेल करत असून ते स्वत: पंतप्रधानांसमोर प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. यावर कुणाच्या सूचना असल्यास त्या रिीहररिींशश्रषेीषरीाशीसारळश्र.लेा या मेल आयडीवर पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातली ही महापरिषद बोलवायला इतका उशीर का झाला यावर याची घोषणा झाल्यापासूनच विविध स्तरांवर काम सुरू आहे. आता त्याला आणखी मूर्त स्वरूप देण्यासाठी ही परिषद असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: