Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केरळच्या शिपयार्डमध्ये स्फोट;
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: mn2
पाच ठार, अकरा जखमी
5कोची, दि. 13 (वृत्तसंस्था) : केरळच्या कोचीन शिपयार्डमध्ये जोरदार स्फोट झाला असून त्यात पाच जण ठार झाले आहेत. या स्फोटात 11 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ओएनजीसीचे एक जहाज दुरुस्तीसाठी आणण्यात आले होते. ही दुरुस्ती करताना जहाजात अचानक स्फोट होऊन आग लागल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमनदलाचे जवान आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
आज सकाळी शिपयार्डमध्ये जोरदार आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरून गेल्याने एकच धावपळ उडाली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: