Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात : उच्च न्यायालयाने फटकारले
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: mn3
डीएसकेंच्या अटकेबाबत आता 22 फेब्रुवारी रोजी निर्णय
5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पुन्हा एकदा 50 कोटी भरण्यात अपयशी ठरले आहेत. डीएसकेंच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी होती. सुनावणीवेळी डी.एस. कुलकर्णी यांनी लिलावासाठी 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे सादर केली. 12 कोटींची संपत्ती तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय याबाबत निकाल देणार आहे. दरम्यान, बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने 100 कोटींचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी डीएसकेंना 200 कोटींची संपत्ती तारण ठेवावी लागणार आहे.
गेल्या सुनाणीवेळी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्यासाठी अखेरची संधी देऊनही त्यांनी न्यायालयात रक्कम जमा न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. भीक मागा, उधार घ्या; पण पुढील सुनावणीत रिकाम्या हाती येऊ नका, असे न्यायालयाने त्यांना सुनावले होते. पुढील सुनावणीत डीएसके दाम्पत्याला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने डीएसकेंसह पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागालाही (ईओडब्ल्यू) चांगलेच धारेवर धरले होते. डीएसकेंच्या मालमत्ता लिलावात काढण्यास उशीर का केला जात आहे, असा प्रश्‍नही न्यायालयाने तपास यंत्रणेला केला होता.
न्या. साधना जाधव यांनी कुलकर्णी यांनी दिलेल्या  आदेशानुसार मुदतीत डीएसके 50 कोटी रुपये जमा करू शकले नाहीत. सिंगापूरच्या प्रभुणे इंटरनॅशनल कंपनीने पैसे ट्रान्स्फर केले, असे वकिलांनी सांगितले होते. मात्र सोमवारच्या सुनावणीत काही तांत्रिक कारणास्तव पैसे ट्रान्स्फर न झाल्याचे अ‍ॅड. अशोक मुंदर्गी म्हणाले. परंतु, सरकारी वकिलांनी डीएसके मालमत्तेचा बाजारभाव फुगवून सांगत असल्याचे न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाने यावेळी गुंतवणूकदारांचीही बाजू ऐकून घेतली. बहुतांशी गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना किमान मुद्दल तरी मिळाली पाहिजे. डीएसकेंची अटक की गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणे यापैकी महत्त्वाचे काय आहे, असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलांना केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: