Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तीन नक्षलवाद्यांना छत्तीसगडमध्ये अटक
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: na1
5रायपूर, दि. 13 (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कोंडागाव जिल्ह्यातून तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
भारत-तिबेट सीमा पोलीस व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेत मर्दापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यापैकी निल्धर ऊर्फ गुड्डू (वय 25) याच्यावर तीन लाखाचे बक्षीस होते, असे कोंडागावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्‍वर नाग यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: