Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण तालुक्यात 10 पैकी 7 ग्रामपंचायती पाटणकर गटाकडे
ऐक्य समूह
Friday, March 02, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re3
5पाटण, दि. 28 : पाटण तालुक्यात होवू घातलेल्या 10 सार्वत्रिक व एक पोटनिवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 7 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाने विजय संपादन केला तर अवघ्या 2 ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या देसाई गटाला समाधान मानावे लागले. एक ग्रामपंचायत स्थानिक एकता विकास पॅनेलला मिळाली. दरम्यान 3 ग्रामपंचायतीत सत्तांतर होवून त्या देसाई गटाकडून पाटणकर गटाने काबीज केल्या व 1 ग्रामपंचायत पाटणकर गटाकडून देसाई गटाने काबीज केली. मतमोजणीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. यावेळी एकच वादा बच्चू दादा या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
पाटण तालुक्यातील 10 सार्वत्रिक ग्रामपंचायती व एका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी बुधवार, दि. 28 रोजी पाटण तहसील कार्यालयातील प्रतीक्षालयामध्ये शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. 10 वाजण्याच्या सुमारास मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. जसजसे ग्रामपंचायतींचे निकाल बाहेर पडत होते तस तसा कार्यकर्त्यांचा  उत्साह वाढत होता. दोन टेबलवर 6 फेर्‍यांमध्ये मतमोजणी घेण्यात आली. दुपारी 2 वाजता मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
पाटण तालुक्यातील 10 सार्वत्रिक ग्रामपंचायतींपैकी रुवले, गावडेवाडी, जिंती, कुसरुंड, शीतपवाडी, चौगुलेवाडी, बेलवडे खुर्द या 7 ग्रामपंचायतींवर पाटणकर गटाने आपला झेंडा फडकविला तर उधवणे व गमेवाडी या 2 ग्रामपंचायतीत देसाई गटाने विजय मिळविला. दरम्यान,  जिंती, शीतपवाडी, बेलवडे खुर्द या 3 ग्रामपंचायती देसाई गटाकडून  पाटणकर गटाने खेचून आणत सत्तांतर घडविले.  उधवणे ग्रामपंचायत पाटणकर गटाकडून देसाई
गटाकडे आली.
 रुवले ग्रामपंचायतीत सरपंचपदी हणमंत किसन साळुंखे तर सदस्यपदी बळवंत चंदू साळुंखे, आरती संजय कदम, समाधान शिवराम भालेकर, कमल प्रकाश साळुंखे, शंकर लक्ष्मण सुतार, लक्ष्मी तानाजी साळुंखे, सुनीता युवराज साळुंखे हे निवडून आले. गावडेवाडी ग्रामपंचायतीत हौसाबाई धोंडिराम ताटे या सरपंचपदी निवडून आल्या.  सदस्यपदी शंकर दगडू सपकाळ, लता कोंडिबा सपकाळ, तानाजी भिवाजी कदम, सीता बापू शेळके, ज्योती संजय कदम हे निवडून आले.  शांताराम मालू झोरे व दर्शना विलास कदम हे बिनविरोध निवडून आले आहेत. जिंतीमध्ये सरपंचपदी दामाजी शामराव कदम तर सदस्यपदी उमेश आनंदराव चव्हाण, ईश्‍वरा दगडू सुतार, तानाजी दादू सावंत, इंदिरा रामचंद्र पाटील, इंदूताई उत्तम मोडक, गीता अंकुश मोडक हे विजयी झाले असून ज्ञानू विठ्ठल माईगडे, संगीता सुरेश कुंभार व साधना वसंत पाटील हे बिनविरोध आले आहेत. कुसरुंड ग्रामपंचायतीत खाशाबा केशव पवार हे सरपंच म्हणून तर सदस्यपदी नथुराम शामराव लोहार, मोहन पांडुरंग पाटील, शीतल संतोष कोळेकर, तानाजी जगन्नाथ शिंदे, कविता सचिन पाटील, संगीता प्रकाश शिंदे, विलास राजाराम कोळेकर, सुनंदा मारुती सुतार, संगीता दिलीप पवार हे निवडून आले आहेत. शीतपवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपद रिक्त असून सदस्यपदी जगन्नाथ मारुती पवार, शकुंतला शंकर सावंत हे निवडून आले. स्मिता प्रदीप शेलार व वसंतराव नायकू बाटे हे बिनविरोध आले आहेत.
चौगुलेवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदी उमेश रमेश सूर्यवंशी तर सदस्यपदी सुधाकर बाळाराम सूर्यवंशी, सिंधूताई भानुदास सूर्यवंशी, सुशीला परसू चव्हाण, तानाजी लक्ष्मण चव्हाण, जयश्री संजय माने हे विजयी झाले. बेलवडे खुर्द ग्रामपंचायतीत सरपंचपदी वंदना ज्ञानदेव सुतार व सदस्यपदी चंद्रकांत खाशाबा चव्हाण, संजना जयवंत सुतार, सुनीता किसन पाडेकर, भागवत संपती लोहार, राजेंद्र निवृत्ती पवार, सुजाता शंकर पवार, रामचंद्र शामराव पवार, जयश्री काशिनाथ पवार, बाळाबाई खाशाबा जाधव हे उमेदवार निवडून आले. उधवणे ग्रामपंचायतीत सरपंचपदी विजय खाशाबा साळुंखे यांची निवड झाली. तर सदस्यपदी दत्तात्रय दगडू कारेकर, प्रेमा विकास साळुंखे, रूपाली गणेश साळुंखे, नितीन गोपीनाथ साळुंखे, दीप्ती दीपक पवार, रामचंद्र बाबू साळुंखे हे निवडून आले.  संगीता रामचंद्र शिर्के बिनविरोध निवडून आल्या. गमेवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदी कुणाल प्रताप चंदुगडे हे निवडून आले. सदस्यपदी रेश्मा कैलास साळुंखे, विजय बाळासाहेब साळुंखे, जैतून अब्दुल मुल्ला, सुलाबाई शंकर तिकुडे, तानुबाई दिनकर निकम हे निवडून आले.  संतोष बाबाजी साळुंखे व करिश्मा शकील मुल्ला हे बिनविरोध आले आहेत.
किल्ले मोरगिरी ग्रामपंचायत तटस्थ असून पक्षविरहित स्थानिक एकता विकास पॅनेलने विजय संपादन केला. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी नारायण अवघडे तर सदस्यपदी सुनीता बापू मिसाळ या निवडून आल्या.  मारुती दगडू मिसाळ, मंगल रामचंद्र लाड, बबन दगडू लाड हे बिनविरोध आले असून 3 जागा रिक्तआहेत. पोटनिवडणूक लागलेल्या गुढे ग्रामपंचायतीत सरपंच हा भाजपचा असून 2 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 6 जागांसाठी घेतलेल्या निवडणुकीत पाटणकर गट 2, देसाई गट 2 व भाजपला 2 जागा मिळाल्या. त्यामुळे ग्रामपंचायतीत भाजपचे 5 उमेदवार झाल्याने ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता कायम राहिली आहे. तसेच गुंजाळी ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध
झाली आहे. सरपंचपदी आनंदा किसन लाड तर सदस्यपदी वनिता विष्णू लाड, उत्तम हरी लाड, राधिका यशवंत लाड, कमल संपत लाड, बळीराम बंडू पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.  2 जागा रिक्त आहेत.
निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी पाटण तहसील कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार रामहरी भोसले यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी, महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. मतमोजणीप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाटणचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: