Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अंधारवाडी येथे दोन गटात मारामारी
ऐक्य समूह
Friday, March 02, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re1
5उंब्रज, दि. 28 :घरासमोरील मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत असताना वाईड बॉलच्या कारणावरून अंधारवाडी, ता. कराड येथे तेरा जणांनी पाच जणांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण प्रकरणी तेरा जणांवर गुन्हा दाखल झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी रात्री उशिरा उंब्रज पोलीस ठाण्यात तेरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ओंकार सावंत, सुयश थोरात, स्वप्निल पवार, पांडुरंग सावंत, यश सावंत, वैभव पवार, संभाजी पवार, प्रसाद सावंत, आकाश निगडे,  विजय थोरात, सागर सपकाळ, विक्रम थोरात, गणेश पवार व इतर अशी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत तर अमृत सर्जेराव पवार, आई चित्रा पवार, मित्र रामचंद्र व त्याचे आई व वडील हे या मारहाणीत जखमी आहेत. याबातची फिर्याद अमृत सर्जेराव पवार, वय-24, रा.अंधारवाडी यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अंधारवाडी येथे फिर्यादीच्या घरासमोर क्रिकेट खेळत असताना वाईड बॉलच्या कारणावरून युवकांच्या दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर सायंकाळी या दोन गटात मारामारी झाली. तेरा जणांनी पाच जणांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्याबरोबरच संशयितांनी घरातील साहित्याची नासधूस केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटणकर करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: