Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बाजे (मारुल) येथे तुंबळ मारामारीत पाच जण जखमी
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: re1
5पाटण, दि. 2 : तालुक्यातील मारुल तर्फ बाजे येथे गुरुवार, दि. 1 रोजी सायंकाळी 7 वाजता जमिनीच्या वादातून ग्रामस्थ व बाहेरच्या गावातील लोकांमध्ये तुंबळ मारामारी झाली. यात 5 जण जखमी झाले असून याबाबत 13 आरोपींविरुद्ध गुन्हा कोयनानगर पोलिसात नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुल (बाजे) येथे शेतजमिनीतील बांधावरील झाडे तोडण्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये फिर्यादी भागूजी नारायण बेबले यांच्याशी बांधावरील झाडे तोडण्यावरून वाद झाला. त्यातूनच मग हा वाद विकोपाला गेला व झालेल्या मारहाणीत भागूजी नारायण बेबले, छाया भागूजी बेबले, हणमंत नारायण बेबले, गणपत राऊ बेबले, सुरेश मारुती बेबले यांना मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी रामचंद्र सयाजी पाटील, रा. बाजे, विष्णू सयाजी तिकुडवे, अक्षय यादवराव पाटील, भरत वामन पवार, उत्तम ज्ञानदेव तिकुडवे, मारुती ज्ञानदेव तिकुडवे, अमोल कृष्णत तिकुडवे, स्वागत राजाराम खांडेकर, सर्व राहणार सोनवडे,  जगदीश मोहनराव चव्हाण, हरिश जगन्नाथ कळंत्रे, किरण राजेंद्र उदुगडे, सखाराम पांडुरंग उदुगडे, सुहास सुनील उदुगडे, सर्व रा. नवसरी, ता. पाटण या तेरा  आरोपींविरुद्ध कोयनानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा अधिक तपास स. पो. नि. एन. आर. चौखंडे करीत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: