Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
व्यापारी पतीचा खून करुन फरार झालेल्या पत्नीला पहिल्या पतीसह अटक
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 4 : मालेगाव (जि. नाशिक) येथील परप्रांतीय डाळिंब व्यापारी पतीचा खून करून फरार झालेल्या पत्नीसह तिच्या पहिल्या पतीस रमजानपुरा (मालेगाव) पोलिसांनी अटक केली. त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरून शुक्रवार, दि. 2 मार्च रोजी रात्री 8 च्या दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या दोघांना मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अधिक माहिती घेतली असता त्यांचा फलटण शहरात कोणाशीही संबंध आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ते फलटण मार्गे अजून पुढे कुठे जाणार होते का? किंवा अजून कोण या घटनेत सामील आहे का? याचा तपास पोलीस घेत आहेत. 
 त्यांच्याजवळ असलेल्या सामानाची तसेच त्यांनी कोणाकोणाला फोन केले याचा तपास पोलीस घेत आहेत. या दोघा पती-पत्नीला मालेगाव पोलिसांनी अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: