Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण येथे मिलिंद ट्रेडिंग कंपनीच्या भव्य दालनाचे उद्घाटन
ऐक्य समूह
Wednesday, March 07, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: re2
5फलटण, दि. 6 : मिलिंद ट्रेडिंग कंपनी या वाघोलीकर कुटुंबीयांच्या येथील नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार गृहोपयोगी (होम अप्लायन्सेस) उत्पादनांच्या भव्य दालनाचे उद्घाटन मंगळवारी राजकुमार तुळजाराम शहा (वाघोलीकर) व सौ. कुसुमताई राजकुमार शहा (वाघोलीकर) या दांपत्याच्या करण्यात आले. वाघोलीकर कुटुंबीयांसह फलटण व बारामती शहरातील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1960 पासून मिलिंद ट्रेडिंग कंपनी या फर्मच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक व होम अप्लायन्सेस उपलब्ध करून देत सुरू केलेला व्यवसाय आज तिसर्‍या पिढीत ग्राहकांना सस्मित सेवा देताना निश्‍चितपणे ग्राहकांचे समाधान करण्यात यशस्वी झाला आहे. फलटण येथे सुरू केलेल्या या नव्या दालनाद्वारेही फलटणकरांना त्याच पद्धतीची सस्मित सेवा आणि नामवंत कंपन्यांची दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मिलिंद शहा व चकोर शहा यांनी सांगितले.
बारामती शहरात भिगवण रोडवर प्रशस्त व अद्ययावत अशी सुमारे 20 हजार चौरस फूट क्षेत्रफळाची पाच मजली शोरूम उभी करून
त्यामध्ये एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, आटाचक्की, वॉटर प्युरिफायर,
डिश वॉशर, मिक्सर व फूड प्रोसेसर, किचन चिमणी, गॅस शेगडी, इलेक्ट्रिक व गॅस गिझर, डिजिटल कॅमेरे, होम थिएटर्स, रेडिओ, एअर व वॉटर कूलर्स वगैरे नामवंत कंपन्यांच्या वस्तू एकाच दालनात उपलब्ध आहेत.
फलटणमध्ये रिंगरोडवर, हॉटेल मधुदीपशेजारी आशिष प्लाझा या इमारतीत प्रशस्त दालन (शोरूम) आज उद्घाटनानंतर फलटणकरांसाठी खुले करून देण्यात आले आहे. फलटणकरांनी उत्स्फूर्तपणे या शारूमला भेट देऊन मिलिंद ट्रेडिंग कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या नामवंत कंपन्यांच्या या गृहोपयोगी वस्तूंची पाहणी करून माहिती घेतली. काही ग्राहकांनी लगेच खरेदीही केली असून फलटणकरांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून वाघोलीकर कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत ग्राहकांना दर्जेदार उत्पादने रास्त किमतीत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. फलटणकरांनी या शोरूमच्या उद्घाटनानिमित्त समक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. आशिष प्लाझा इमारतीचे मालक शिरीष पवार उर्फ दादा, सौ. अलकाताई पवार, नितीन दोशी (गुणवरेकर), नितीन मेहता, दै. ‘ऐक्य’चे  व्यवस्थापकीय संपादक शैलेंद्र पळणिटकर, जाहिरात विभागप्रमुख सुरेश चिंचकर, अरविंद मेहता यांनी वाघोलीकर कुटुंबीयांच्या फलटण येथील या शोरूमला शुभेच्छा देतानाच या व्यवसायाची जबाबदारी असलेल्या समीर शहा यांनाही शुभेच्छा दिल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: