Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द, एक निरीक्षक वाहतूक शाखेत
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 7 : जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकार्‍यांच्या बदल्यांचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी रद्द  केला आहे. तातडीने बदल्या का केल्या आणि पुन्हा तातडीने आदेश का रद्द केला हे न उलगडणारे कोडे असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी एक वर्षापूर्वी शहर पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेतला होता. एका वर्षातच त्यांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. त्याशिवाय शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांची जिल्हा वाहतूक शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक एस. बी. गायकवाड यांची शहर पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या बदल्या रद्द करण्यात आल्या असून नारायण सारंगकर यांना शहर तर  किशोर धुमाळ यांच्याकडे शाहूपुरी पोलीस ठाण्याचा पदभार जैसे थे ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस.बी. गायकवाड यांच्याकडे मात्र जिल्हा वाहतूक शाखेचा पदभार देण्यात आला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: