Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाईभत्त्यात 2 टक्के वाढ
ऐक्य समूह
Thursday, March 08, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : केंद्रातील सरकारी कर्मचार्‍यांना मोदी सरकारने 2 टक्के महागाई भत्तावाढीची गोड भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा देशभरातील 48.41 लाख कर्मचारी आणि 61.17 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. 1 जानेवारी 2018 पासून ही महागाईभत्तावाढ पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला. मूळ वेतनाच्या आधारे ही महागाई भत्तावाढ कर्मचार्‍यांना मिळणार आहे. महागाई भत्तावाढीच्या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी 6 हजार 77.72 कोटी रुपये इतका भार पडणार आहे. 1 जानेवारी 2018 ते फेब्रुवारी 2019 हा 14 महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास यावर्षी 7 हजार 90.68 कोटी इतका भार पडेल, असे नमूद करण्यात आले आहे. केंद्राने सातव्या वेतन आयोगातील शिफारशींच्या अनुषंगाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: