Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुंड राजा शेंबडाची गळफास घेवून आत्महत्या
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:21 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 9 : बोगदा येथील प्रसिध्द गुंड राजू रामदास नलवडे उर्फ राजा शेंबडा याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.  या घटनेची खबर त्याचा मुलगा अजित राजू नलवडे याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी दुपारी राजा शेंबडाचा मृत्यू झाल्याची चर्चा सर्वत्र होती. मात्र मृत्यू नेमका कसा झाला याबाबत माहिती उपलब्ध होत नव्हती. अखेर राजा शेंबडा याने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेंबडा राजा याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी नलवडे कुटुंबीयांकडे प्राथमिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे कारण सुरुवातीला सांगितले. रात्री उशिरा पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय कुटुंबीयांशी चर्चा करुन घेतला. हा निर्णय घेतानाही कुटुंबीयांची समजूत पोलिसांना काढावी लागली. अखेर रात्री उशिरा 10 वाजण्याच्या शवविच्छेदन केल्यानंतर राजू नलवडे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: