Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एका डॉक्टरला दुसर्‍या डॉक्टरकडून मारहाण
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 9 : पैसे मागितल्यानंतर ते दिले नसल्याच्या कारणातून चिडून जावून शेंद्रे, ता. सातारा येथे डॉक्टरला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत डॉक्टर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एक महिला आणि डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर असणारे मेडिकल ऑफिसर डॉ. रवींद्र शिवाजीराव धुमाळ (रा. अजिंक्यतारा कॉलनी, शेंद्रे) यांनी याबाबत तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरुन गजानन पोतेकर, सुजाता शिंदे, डॉ. सुतार व सुरेश पोतेकर (सर्व रा. शेंद्रे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  साखर कारखाना येथे दि. 19 रोजी तक्रारदार व संशयितांची भेट झाली. त्यानंतर संशयितांनी डॉक्टरला आरोग्य शिबिर घेण्याची गळ  घातली. त्यानंतर तक्रारदारांनी परवानगी घेण्याचा सल्ला दिला. तिसर्‍या भेटीवेळी यातील महिलेने तक्रारदार डॉक्टरकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले. दि. 1 मार्च रोजी संशयितांनी डॉ. धुमाळ यांना चिंद्या पीर येथे  बोलावून घेतले. तक्रारदार त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयितांनी मारहाण करुन त्यांना तेथून पुढे नेवून पुन्हा पाइप, लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली व तेथेच सोडून दिले. तक्रारदार यांना गंभीर मारहाण झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी शुध्दीत आल्यानंतर मारहाण झाली असल्याची तक्रार त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: