Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
झणझणे सासवड येथील खासगी सावकारावर गुन्हा
ऐक्य समूह
Saturday, March 10, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: re1
सावकारी व्याजाने पावणेदोन लाखांची वसुली
5लोणंद, दि. 9 : हिंगणगाव, ता. फलटण येथील अमोल गजानन पवार यांना व्याजाने पैसे देऊन मुद्दल रकमेपेक्षा अधिक पैसे व्याजापोटी वसूल करणारा खासगी सावकार दादासाहेब किसन हेंद्रे याच्यावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दादासाहेब किसन हेंद्रे (रा. झणझणे सासवड, ता. फलटण) याच्याकडे सावकारी करण्याचा परवाना नसताना त्याने 2014 मध्ये अमोल गजानन पवार (रा. हिंगणगाव) यांच्या सासवड येथील श्री गुरुदत्त हेअर सलूनमध्ये 1 लाख 70 हजार रुपये 10 टक्के व्याजाने बेकायदेशीर सावकारी पद्धतीने दिले होते. अमोल पवार यांनी हेंद्रे यास मार्च 2017 पर्यंत 5 लाख 56 हजार रुपये व्याज दिले. त्यानंतर मुदलातील 1 लाख 55 हजार रुपये त्यास दि. 9 डिसेंबर 2018 पर्यंत टप्प्याटप्प्याने दिले. मुद्दल व व्याज मिळून एकूण 7 लाख 11 हजार रुपये अमोल पवार यांनी देऊनसुद्धा दादासाहेब हेंद्रे याने दि. 7 मार्च रोजी हिंगणगाव येथे अमोल पवार यांच्या घरी जाऊन  शिवीगाळ व दमदाटी केली. तू मला आतापर्यंत काहीही पैसे दिले नसून 7 लाख 40 हजार रुपये दिले नाहीत तर सासवडमध्ये तुझ्या दुकानात पाय ठेऊन देणार नाही, अशी धमकी हेंद्रे याने दिल्याची फिर्याद अमोल पवार यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली असून सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोईटे
तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: