Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
क्षुल्लक कारणावरुन एकावर कोयत्याने वार
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11 : तुझ्यामुळेच नोकरीचा राजीनामा द्यावा लागला, असे म्हणत शाहूपुरी येथे राहणार्‍या विनय अविनाश माने (वय 24) या युवकाने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास किरण सर्जेराव माने (वय 26, रा. भक्तवडी, ता. कोरेगाव) याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून नटराज मंदिर चौक (बॉम्बे रेस्टॉरंट) परिसरात कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात माने जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घडलेल्या या थरारक घटनेनंतर नागरिकांनी संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
विनय माने हा काही दिवसांपूर्वी एमआयडीतील एका कंपनीमध्ये नोकरीस लागला होता. किरण माने हा देखील तेथेच नोकरीला होता. दोन दिवसांपूर्वी कंपनी व्यवस्थापनाने    विनय माने याच्याकडून नोकरीचा राजीनामा लिहून घेतला होता. किरण माने यानेच काहीतरी सांगितले असेल, त्यामुळेच कंपनीने राजीनामा लिहून घेतल्याचा समज विनय माने याचा झाला होता. शनिवारी किरण माने हा नटराज मंदिर चौक येथून वाढे फाट्याकडे निघाला होता. त्या ठिकाणी विनय माने  आला व त्याने सोबत आणलेली मिरचीची पूड हातात घेत किरणच्या डोळ्यात टाकली. यावेळी होणारी मारहाण अडवत असतानाच विनय माने याने किरणच्या पाठीत कोयत्याने वार केला. भर रस्त्यात हा थरारक प्रसंग घडत असताना परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना त्याची माहिती दिली. दोन युवकांच्या भांडणामुळे तणावाचे वातावरणही झाले. परिसरातील नागरिकांनी संशयित युवकाला पकडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत परिसरातील गर्दी हटवली. या प्रकरणी किरण याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: