Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चेहर्‍याला काळे फासले
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: na1
5लाहोर, दि. 11 (वृत्तसंस्था) :  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या चेहर्‍याला काळे फासण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा पंजाब प्रांतात पक्ष कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना ही घटना घडली. शाई फेकणारी व्यक्ती कट्टरतावादी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर आसिफ यांच्या सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर नेले. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, चेहरा धुवून आसिफ यांनी आपले भाषण पूर्ण केले.  
दरम्यान, प्राथमिक चौकशीत ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: