Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अंबवडे येथे ऊस जळून सुमारे 8 लाखांचे नुकसान
ऐक्य समूह
Monday, March 12, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: re2
5वडूज, दि. 11 : अंबवडे, ता. खटाव येथील वाडकेचा मळा नावाच्या शिवारातील एकूण सहा एकर क्षेत्रातील ऊस व ठिबक साहित्य जळून सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार दि. 11 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अंबवडे येथे वाडकेचा मळा नावाच्या शिवारात लागलेल्या आगीमुळे ऊस व ठिबक सिंचनाचे साहित्य जळून सुमारे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. सचिन धोंडिराम पवार यांच्या पाच एकर शेतातील तीन महिन्याचे ऊस पीक व ठिबक व हौसाबाई तानाजी घाडगे यांच्या एक एकर शेतातील पंधरा महिन्याचे ऊस पीक जळून खाक झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. हवालदार शांतीलाल ओंबासे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: